लोणी बुद्रुकमध्ये डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केटसह विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

राहाता, वैभव ताजणे
“दर पाडव्याच्या बैठकीत गावकऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मागणीचं समाधान आज पूर्ण झालं आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केट, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प ही केवळ विकासकामं नाहीत, तर गावाच्या एकतेचं आणि विश्वासाचं प्रतीक असल्याचे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले

जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून लोणी बुद्रुक येथे १ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजनाचा सोहळा माजी खासदार व युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. त्या वेळी डॉ सुजय विखे पाटील बोलत होते.
यावेळी १ कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या पत्राशेड व प्रसाधनगृह, १ कोटी १२ लाख रुपये खर्चाच्या सांडपाणी प्रकल्पाचे आस्थापिकरण, तसेच गोगलगाव येथील घनकचरा प्रकल्पातील पशुदाहिनी (१ कोटी रुपये) या महत्त्वाच्या विकासकामांचे भूमिपूजनही संपन्न झाले. त्याचबरोबर लोणी मटन मार्केटमधील ५० लाख रुपये खर्चाच्या पशुदाहिनीचे लोकार्पणही डॉ. विखे यांच्या हस्ते पार पडले.

ते पुढे म्हणाले, “गावासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि अध्यक्ष मॅडम यांची मनापासून इच्छा होती की लोणीच्या विकासाची ही कामं व्हावीत, आणि आज ती प्रत्यक्षात उतरली आहेत. गावाने मागितलेलं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत डॉ. विखे म्हणाले,“शॉपिंग कॉम्प्लेक्स स्थलांतराच्या निर्णयावर एका ग्रामस्थानेही विरोध केला नाही, उलट सर्वांनी एकमताने साथ दिली. हा विश्वास माझी खरी ताकद आहे, आणि तो मी कधी तुटू देणार नाही.”
“लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द ही गावं आज महाराष्ट्रातील प्रगतशील ग्रामपंचायतींचं उदाहरण ठरत आहेत. राजकारणात पदं येतात-जातात, पण दिलेला शब्द पाळणं हीच माझी खरी जबाबदारी आहे. पुढच्या काळात लोणी गाव हे शहराला टक्कर देईल आणि बाळासाहेब विखे, नामदार राधाकृष्ण विखे व अध्यक्ष मॅडम यांनी पाहिलेलं स्वप्न आपण मिळून पूर्ण करू.” – डॉ. सुजय विखे पाटील

महाराष्ट्रातील पहिल्या ‘चिकन-मटन मार्केट’ सुमारे ६० लाख रुपये खर्चून ३४ गाळ्यांची उभारणी करण्यात आली असून, बाजारातील स्वच्छतेसाठी एसटीपी प्लांट (१ कोटी रुपये) आणि इन्सिनेरेटर मशीन (३६ लाख रुपये) मंजूर करण्यात आली आहे
0 Comments