परमपूज्य टेंभे स्वामींच्या उपस्थितीत भाविकांचा लाभ

संगमनेर, वैभव ताजणे,
जवळेकडलग (ता. संगमनेर) येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प.पू. सदगुरू श्री श्री श्री नारायण (आण्णा) महाराज यांच्या पादुका पूजन, महाआरती व महाप्रसादाचा भव्य धार्मिक सोहळा भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी श्री ज्ञानदेव (माऊली) देशमुख यांच्या वस्तीवर, जवळेकडलग येथे संपन्न होणार आहे.

रविंद्र (बापू) देशमुख यांनी सांगितले की, “सालाबाद प्रमाणे या पवित्र दिवशी आपण सर्व भाविकांनी एकत्र येऊन सदगुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावे, हीच खरी दिवाळीची पुण्याई आहे. प.पू. टेंभे स्वामींच्या उपस्थितीत या वर्षीचा सोहळा भक्ती, प्रेम आणि समरसतेचा संदेश देईल.

या प्रसंगी परमपूज्य सदगुरू टेंभे स्वामी यांच्या पावन उपस्थितीने संपूर्ण परिसर अध्यात्ममय होणार असून, माजी खासदार व विखे कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल तसेच परमपूज्य सदगुरू टेंभे स्वामी यांचे दर्शन लाभ पाडव्याच्या मंगलमुहूर्तावर भाविकांना घेता येईल अशी माहिती रविंद्र (बापू) देशमुख यांनी दिली.

सांयकाळी ७ वाजता शुभमुहूर्तावर पादुका पूजनानंतर भजन, नामस्मरण, प्रवचन व महाआरतीने वातावरण भक्तिरसात रंगणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


0 Comments