विखे पाटील— आश्वी-जोर्वे कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न
आश्वी, वैभव ताजणे
नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठलाही विलंब न करता राज्य सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे, असे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ कोटी २० लाख रुपयांची मदत वितरित झाली असून, काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अजून ११ हजार कोटींच्या मदतीला मंजुरी देण्यात आली.

तालुक्यातील आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते.ते पुढे म्हणाले, “शिर्डी मतदारसंघात विकासाची प्रक्रिया कुठेही कमी झालेली नाही. ग्रामस्थ आणि कार्यकर्ते सुचवतील त्या पद्धतीनेच विकासकामे होत आहेत. निळवंडे उजव्या कालव्याची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवून शेतकऱ्यांना पाणी देता आलं, हे मोठं समाधान आहे.”

प्रवरा उजवा व डावा कालवा यांच्या नूतनीकरणासाठी दीडशे कोटी रुपयांची उपलब्धता करून देण्यात आली असून, शिर्डी मतदारसंघातील युवकांच्या रोजगारासाठी सुरू असलेली औद्योगिक वसाहत आता गती पकडत असल्याचे त्यांनी सांगितले. “अनेक उद्योजक त्या ठिकाणी उद्योग सुरू करत आहेत. अतिशय कमी कालावधीत या औद्योगिक वसाहतीतून स्थानिक तरुणांसाठी भरपूर रोजगार निर्माण होईल,” असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

गट व गण नियोजनावर भरगट आणि गणांचे नियोजन कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू करण्याचे आवाहन करताना, गावपातळीवर नागरिकांशी संपर्क वाढवण्याची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही सूचित मंत्री विखे पाटील यांनी केले.शाळीग्राम होडगर, संस्थापक — मांची हिल संस्थान

भाजपमध्ये नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेशया मेळाव्यात संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, वाघापुरचे माजी उपसरपंच विनोद घोलप, अमृत दूध संस्थेचे संचालक रामभाऊ शिंदे, वाघापुर सोसायटीचे संचालक साहेबराव शिंदे, साईराम राहाणे, शारदा पतसंस्थेचे नानासाहेब शिंदे, दीपक पानसरे, बाबासाहेब शिंदे, संदिप शिंदे, तसेच जोर्वे युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ बलसाने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मंत्री विखे पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून अभिनंदन केले.

“आपल्या सर्वांच्या योगदानामुळे राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आले आहे. हे लोकाभिमुख सरकार आहे. जे फक्त घोषणा करत नाही तर प्रत्यक्ष मदत अंमलात आणते. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतही त्याच जोमाने कार्यरत राहून महायुतीला विजयी करण्यासाठी कटिबद्ध व्हा.” ना. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा तथा पालकमंत्री


0 Comments