वंचित घटकांच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांची कामे करून त्यांच्या जीवनमानात खरा बदल घडवण्याचा आमचा निर्धार आहे. आमदार खताळ

“तालुक्यातील विकासाला चालना देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी सोयीसुविधा देणारी दर्जेदार कामे केली जात आहेत.दलित वस्ती सुधार योजनेतून मिळालेला ४ कोटी ७३ लाखांचा निधी हा सामाजिक समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर,वैभव ताजणे
संगमनेर तालुक्यातील विकासाला नवसंजीवनी मिळाली आहे. दलित वस्ती सुधार योजना (Dalit Vasti Sudhar Yojana) अंतर्गत ४ कोटी ७३ लाख रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला असून, हा निधी आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या निधीतून तालुक्यातील ८१ विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
दलित वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणारआमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजनांचा पाऊस पडत आहे. ग्रामीण भागातील वंचित आणि दलित वस्त्यांतील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. परिणामी दलित वस्ती सुधार योजनेतून तब्बल ४ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून खालील महत्त्वाची कामे केली जाणार आहेत —बंदिस्त गटारे बांधकाम,पाणीपुरवठा योजना व वीजपुरवठा सुविधा रस्त्यांचे काँक्रिटीकरण,पेव्हर ब्लॉक बसविणे समाज मंदिर बांधकाम व दुरुस्ती, आरओ (RO) शुद्ध पाणी प्रकल्पया कामांमुळे पायाभूत सुविधा मजबूत होतील, स्वच्छता व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध होतील आणि ग्रामीण वस्त्यांचा जीवनमान सुधारेल.
आमदार खताळ यांचा विकासदृष्टीकोन
आमदार अमोल खताळ यांनी एक वर्षाच्या कार्यकाळातच शेकडो कोटी रुपयांचा निधी संगमनेर विकासासाठी खेचून आणला आहे. त्यांनी सांगितले की, “नागरिकांच्या गरजा ओळखून त्यावर उपाययोजना करणे हे माझं प्रथम कर्तव्य आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक वस्तीत विकास पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे.”त्यांनी पुढे सांगितले की, या योजनांमुळे दलित वस्त्यांतील रस्त्यांची दुरवस्था, पाणी निचरा, आणि सार्वजनिक सुविधांची कमतरता दूर होणार असून सामाजिक समतेचा नवा अध्याय सुरू होईल.
मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचे आभार. या निधीच्या मंजुरीबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा मोठा निधी संगमनेर तालुक्याच्या खात्यात जमा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक अंमलबजावणीला गती. आमदार खताळ यांनी सांगितले की, या सर्व कामांची स्थानिक ग्रामपंचायतींशी समन्वय साधून नियोजनबद्ध अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे विकासकामांमध्ये पारदर्शकता येईल आणि निधीचा योग्य वापर सुनिश्चित होईल.


0 Comments