साकुर, युनूस शेख
बिरेवाडीत सोसायटी व दूध संस्थेचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात यांची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक
आपल्या परिसरातील जाहिरात बातमी देण्यासाठी संपर्क करा संपादक वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४
आज काही जण आपल्यात भेद निर्माण करण्याचा, विष कालविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण सावध राहिलं पाहिजे. संघटनेची ताकद हीच आपली ओळख आहे. संगमनेरचा विकास हा फक्त माझा नव्हे तर प्रत्येक कार्यकर्त्याचा ध्यास आहे, असेभावनिक आव्हान यावेळी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

बिरेवाडी (ता. संगमनेर) येथे गजानन सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले,संगमनेर विधानसभेला जे झालं ते झालं. पण आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण सर्वांनी भक्कम उभं राहिलं पाहिजे. ही निवडणूक म्हणजे एकतेची खरी परीक्षा आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वांची मदत झाली पाहिजे.


थोरात यांनी संस्थांच्या कार्याची प्रशंसा
गाव पातळीवर संस्था उभ्या राहिल्या की विकासाचा पाया रुंदावतो. सहकार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सहकाराच्या माध्यमातून रोजगार, उत्पादन आणि आत्मनिर्भरता या तीन गोष्टी मजबूत होतात.”
कार्यक्रमातील मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिरा शेटे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर व रामदास धुळगंड, माजी संचालक शांताराम कढणे, तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, अमृतवाहिनी बँकेचे संचालक श्रीकांत गिरी, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, जांबुतच्या सरपंच सोनाली शेटे, बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले, भगवान उद्योग समूहाचे संस्थापक आदिकराव खेमनर, शेतकी संघाचे माजी संचालक विठ्ठल भागवत, साहेबराव बारवे, तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात, तालुका सचिव प्रकाश कडलग, सरपंच जिजाबाई सागर, माजी सरपंच निलम ढेंबरे, हिवरगाव पठार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग वामन, रणखांबचे सरपंच बाबाजी गुळवे, आउटरिच युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मण कुदनर, युवा नेते बाळासाहेब सागर, मल्हारी सोन्नर, सचिन खेमनर, माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर, उत्तर कुदनर, बाबाजी सागर आदी मान्यवर उपस्थित होते.

बिरेवाडीतील या कार्यक्रमाने फक्त दोन इमारतींचा शुभारंभ झाला नाही, तर संगमनेरच्या राजकारणात एकतेचा आणि सहकाराचा नवा सूर उमटवला. बाळासाहेब थोरात यांच्या ट्रॅक्टरमधून निघालेल्या मिरवणुकीने गावातील जनतेच्या मनात पुन्हा एकदा “आपला नेता, आपला माणूस” अशी भावना जागवली.

0 Comments