🎓 आश्वी खुर्द जि.प. शाळा — माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा यशस्वी; भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांची ₹५१,००० देणगी ✨
आश्वी,वैभव ताजणे
“जि.प. शाळांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी संपूर्ण गावाची आहे. पालक आणि ग्रामस्थ एकत्र आल्याशिवाय हा लढा शक्य नाही,” असे स्पष्ट मत भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जि.प. प्राथमिक शाळेत बालदिनानिमित्त माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शाळेच्या विकासासाठी ₹५१,००० ची भरीव देणगी जाहीर करून विकास गायकवाड यांनी सकारात्मक पुढाकार घेतला.

पुढे बोलताना ते म्हणाले, “आजच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना जिल्हा परिषद शाळा कडवे आव्हान देत आहेत. आजही अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी मराठी माध्यमातूनच शिकून देशाच्या सर्वोच्च पदांवर पोहोचले आहेत.”

“ही शाळा आमच्यासाठी केवळ शिक्षणाची संस्था नव्हती; हे आमचे गुरुकुल होते. आज आपण ज्या उंचीवर पोहोचलो, त्याची पायाभरणी याच शाळेत झाली. शाळेला ‘आदर्श व रोल मॉडेल’ बनवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कार्य करणे अत्यावश्यक असल्याचे मत माजी जि.प. सदस्य आण्णासाहेब भोसले यांनी व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य शाळेच्या विकासासाठी विक्रम गायकवाड आणि संजय गायकवाड यांनी ही सामूहिक पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच सचिन शिंदे, राहुल गायकवाड, बाळा क्षिरसागर, सुमित गायकवाड, मंच्छींद्र गायकवाड, अतुल गायकवाड आणि संतोष गायकवाड यांनी शाळेच्या कार्यालयासाठी फर्निचरचा टेबल देणगी म्हणून दिला.मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थितीया स्नेहमेळाव्यास मोठ्या संख्येने मान्यवर व माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यात बापुसाहेब गायकवाड, सरपंच अलका गायकवाड, डॉ. दिनकर गायकवाड, मकरंद गुणे, माजी प्राचार्य जगदिश मुन्तोडे, पत्रकार श्रीरंग गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सोपान सोनवणे, शिक्षिका वर्षा दातीर, राजश्री महामिने, सेवानिवृत्त शिक्षिका शोभा गायकवाड, सौ. कदम, स्कुल कमिटी अध्यक्षा प्रज्वली खरात, उपाध्यक्ष सागर भडकवाड तसेच संजय भोसले, सोमनाथ वाळेकर, सुनील मांढरे, काशिनाथ गायकवाड, संपत भोकरे, विमल गव्हाणे, जया कांबळे, अमोल गायकवाड, राहुल भोकरे, अशोक भोसले, एकनाथ मुन्तोडे, विशाल गव्हाणे, संदीप दातीर, सचिन क्षिरसागर आणि बाळासाहेब गायकवाड यांचा समावेश होता.
मुख्यध्यापिका सविता भुसाळ–गायकवाड यांनी प्रास्ताविक करून माजी विद्यार्थ्यांचे महत्व अधोरेखित केले. आगामी स्नेहमेळाव्यात अधिकाधिक माजी विद्यार्थी सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नंदु शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप बोरुडे यांनी मानले

0 Comments