साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सुटणार; विखे पाटील यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ

जाहिरात,बातमी देण्यासाठी संपर्क करा, पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ साकुर- युनूस शेख गेल्या अनेक दशकांपासून तालुक्यातील साकूर पठार भागाचा प्रलंबित पाणी प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या भागाला नवसंजीवनी मिळणार आहे, Read more…

भर दिवसा आठवडे बाजाराच्या दिवशी घरफोडी; दोन लाखांची चोरी, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

गावालगत दिवसा चोरी; पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्न आश्वी,वैभव ताजणे आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे सोमवारी (दि. १०) आठवडे बाजाराच्या दिवशी भर दिवसा चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावालगत झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले Read more…

“पाण्याचे हे जार केवळ भेट नसून समाजसेवेची आणि मानवतेची ओल आहे.” अध्यक्ष, संजय गायकवाड 

ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्थेला पिण्याच्या पाण्याचे जार भेट — सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम आश्वी | वैभव ताजणे “संतांच्या शिकवणीप्रमाणे सेवा, सहकार्य आणि संस्कार हेच आमच्या कार्याचे मूळ आहे. पाण्याचे हे जार ही केवळ भेट नसून समाजसेवेची आणि मानवतेची ओल आहे. ज्ञानराज माऊली संस्थेसारख्या संस्था आपल्या संतपरंपरेचे जतन करत आहेत, Read more…

विष कालविणाऱ्यांना दूर ठेवा, एकतेने उभे राहा!” माजी आमदार बाळासाहेब थोरात.

साकुर, युनूस शेख बिरेवाडीत सोसायटी व दूध संस्थेचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात यांची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक आपल्या परिसरातील जाहिरात बातमी देण्यासाठी संपर्क करा संपादक वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ आज काही जण आपल्यात भेद निर्माण करण्याचा, विष कालविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण सावध राहिलं पाहिजे. संघटनेची ताकद हीच आपली ओळख आहे. Read more…

संगमनेरला दलित वस्ती सुधार योजनेतून ₹४.७३ कोटी निधी – आमदार खताळ

वंचित घटकांच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांची कामे करून त्यांच्या जीवनमानात खरा बदल घडवण्याचा आमचा निर्धार आहे. आमदार खताळ “तालुक्यातील विकासाला चालना देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी सोयीसुविधा देणारी दर्जेदार कामे केली जात आहेत.दलित वस्ती सुधार योजनेतून मिळालेला ४ कोटी Read more…

“गावाचा विकास हा एकतेचा आणि विश्वासाचा विजय” – डॉ. सुजय विखे पाटील

लोणी बुद्रुकमध्ये डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केटसह विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राहाता, वैभव ताजणे “दर पाडव्याच्या बैठकीत गावकऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मागणीचं समाधान आज पूर्ण झालं आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केट, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प ही केवळ विकासकामं नाहीत, तर गावाच्या एकतेचं आणि विश्वासाचं प्रतीक असल्याचे Read more…

संगमनेरमध्ये विकासकामांच्या श्रेयावरून राजकारण तापले — पदवीधर आमदार तांबे यांच्यावर गुलाबराजे भोसले यांचा हल्ला

जाहिरात,बातमी देण्यासाठी संपर्क करा. संपादक,पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या निधीचे श्रेय घेण्याचा तांबे यांचा बनावट प्रयत्न; भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांची पोलख संपादक वैभव ताजणे मो.7709254924 साकुर, युनूस शेख. संगमनेर तालुक्यातील विकासकामांना निधी मिळवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर वसंतराव नाईक तांडा Read more…

पिंप्री लौकी–अजमपूर येथे सर्वरोग निदान शिबिर संपन्न

“आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे माणूस वेगवेगळ्या आजारांच्या विळख्यात सापडत आहे” — भारत गीते आश्वी,वैभव ताजणे “आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे माणूस वेगवेगळ्या आजारांच्या विळख्यात सापडत आहे. वेळेवर तपासणी न झाल्यामुळे किरकोळ आजार गंभीर स्वरूप धारण करतात. त्यामुळे अशा सर्वरोग निदान शिबिरांच्या माध्यमातून जनतेमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. गावपातळीवर अशा उपक्रमांचे Read more…

श्री गजानन महाराज साखर कारखान्याची लाखो रुपयांची फसवणूक उघड

महसूल अधिकाऱ्यांकडून घारगाव पोलीस ठाण्यात वाहतूक ठेकेदारावर गुन्हा दाखल आश्वी,संजय गायकवाड, संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड (युटेक) या साखर कारखान्याची तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील वाहतूक ठेकेदार किरण अशोक नरवडे याच्यासह त्याचे वडील अशोक जबाजी नरवडे (दोघे Read more…

राजकारण नव्हे, समाजकारणाचा मार्ग शिक्षणातूनच” — आमदार सत्याजित तांबे

सेवानिवृत्त प्राचार्य गिते यांचा सन्मान समारंभ; ‘डिजिटल अभियान’साठी देणगीचा संकल्प करून शिक्षकत्वाचा नवा आदर्श संगमनेर, वैभव ताजणे ३१ वर्षांच्या सेवेतून निवृत्त होत असतानाही, गिते सरांनी सन्मानासाठी खर्च होणारी रक्कम शाळेच्या ‘डिजिटल अभियानासाठी’ देणगी स्वरूपात देण्याचा संकल्प करून शिक्षकत्वाचा नवा आदर्श घालून दिला. सेवानिवृत्ती सत्कारप्रसंगी बोलताना आमदार तांबे म्हणाले, “सध्याचे राजकारण Read more…