७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मांची हिल सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न


जाहिरात,बातमी व पेपर मिळवण्यासाठी संपर्क पत्रकार वैभव ताजणे, मो ७७०९२५४९२४


आश्वी | वैभव ताजणे
मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो समाजामध्ये वावरत असतो. त्यामुळे व्यक्तीहितापेक्षा समाजहिताचा विचार करण्याची जाणीव प्रत्येका मध्ये असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यां मध्ये ही भावना बालपणापासूनच रुजावी, यासाठी चांगल्या सवयी, शिस्त आणि सामाजिक मूल्ये शालेय जीवनातच अंगीकारली पाहिजेत, असे प्रतिपादन मांची हिल शैक्षणिक संकुलाचे विश्वस्थ डॉ. दिग्विजय होडगर यांनी केले
(मांची हिल शैक्षणिक संकुल प्रजासत्ताक दिन कार्यक्रम)

मांची हिल शैक्षणिक संकुल, आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त धर्मेंद्र कलानगरी येथे भव्य मांची हिल सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात ज्ञानगंगा प्राथमिक व माध्यमिक विभाग, ज्ञानगंगा ज्युनियर कॉलेज, महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल तसेच मेडिकल कॉलेज व फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. होडगर बोलत होते.
मांची हिल शैक्षणिक संकुल प्रजासत्ताक दिन कार्यक्रम

ते पुढे म्हणाले की, जपानसारख्या देशातील नागरिक स्वच्छतेबाबत अत्यंत सजग आहेत. दुकानातून घेतलेल्या चॉकलेटचा कागदसुद्धा रस्त्यावर न टाकता स्वतः उचलून कचराकुंडीत टाकण्याची सवय त्यांनी लहानपणापासूनच अंगीकारलेली आहे. शरीर आणि मनाला शिस्तीची सवय लावल्यामुळेच जपान आज प्रगत राष्ट्र म्हणून पुढे गेला आहे.विद्यार्थ्यांनी लहान वयातच स्वच्छता, वेळेचे नियोजन, जबाबदारीची भावना आणि समाजाप्रती कर्तव्य यांची सवय लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

स्वित्झर्लंडमधील एका अनुभवाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, रेल्वे प्रवासादरम्यान एक प्रवासी मोबाईलवर टिपण लिहीत होता. विचारणा केल्यानंतर त्याने सांगितले की, मी शिक्षक असून उद्याच्या वर्गासाठी अभ्यास करत आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. आपल्या देशात अनेकदा विद्यार्थी अभ्यास टाळण्यासाठी कारणे देतात; मात्र परदेशात शिक्षक स्वतः अधिक अभ्यास करून विद्यार्थ्यांना नवे काय देता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षक, पालक आणि शाळा यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून बालपणात लागलेल्या चांगल्या सवयीच आयुष्याला योग्य दिशा देतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अँड शाळीग्राम होडगर,सचिव निलीमा गुणे,अध्यक्ष विजय पिसे,उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे,डॉ शामल निर्मळ,डॉ नितिन आहेर,दत्ता शिंदे,इंजिनिअर महेश हाळणोर, सुनील आढाव,अतुल खपके, सचिन भाकरे, प्रवीण गाडे ,सुशांत होडगर शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आहे

0 Comments