

✨🎬 *अथर्व दीपक म्हस्के — स्वप्नातून पडद्याकडे, आणि पडद्यावरून यशाकडे ! चित्रपटसृष्टीकडे आत्मविश्वासपूर्ण वाटचाल * 🎓✨

रोल, कॉमेरा एक्शन हे शब्द केवळ चित्रपट निर्मितीपुरते मर्यादित नसून, आयुष्याला दिशा देणारे- अथर्व म्हस्के
आश्वी | वैभव ताजणे,

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वास, सातत्य आणि परिश्रमाच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा निर्धार करत, आता जीवनाच्या पडद्यावर स्वतःची भूमिका जबाबदारीने साकारण्याचा संकल्प रोल, कॉमेरा एक्शन हे शब्द केवळ चित्रपट निर्मितीपुरते मर्यादित नसून, आयुष्याला दिशा देणारे प्रेरणादायी तत्त्व असल्याचे प्रतिपादन अथर्व दीपक म्हस्के यांनी केले आहे.

अथर्व म्हस्के हा बाभळेश्वर (ता. राहाता) येथील वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले दाम्पत्य — प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दीपक म्हस्के व स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच अहिल्यानगर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या डॉ. वैशाली म्हस्के यांचा सुपुत्र आहे. सामाजिक, वैद्यकीय व सेवाभावी क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कुटुंबातून अथर्वने कलाक्षेत्राची निवड करत वेगळा मार्ग स्वीकारला असून, त्याच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच खंबीर पाठिंबा दिला

हा संकल्प प्रत्यक्षात उतरवत अथर्वने मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या सुप्रसिद्ध व्हिसलिंग वूड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रशिक्षण संस्था येथून चित्रपट निर्मिती विषयातील पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

या निमित्ताने पार पडलेला पदवी प्रदान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.या भव्य समारंभास हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते “अपना भिडूभाई” जॅकी श्रॉफ, प्रख्यात छायाचित्रण दिग्दर्शक अनिल मेहता, संस्थेचे संस्थापक सुभाष घई, बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता प्रसन्नजीत चॅटर्जी, तसेच आमिर खान प्रॉडक्शन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, संकलन व विविध तांत्रिक शाखांचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. अथर्वसाठी हा क्षण केवळ शैक्षणिक यशाचा नसून, आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला.

याच कुटुंबातील कन्या डॉ. दिशा म्हस्के हिने वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) यशस्वीरीत्या पूर्ण केली असून सध्या ती पुढील उच्च वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शिक्षण, सेवा, संस्कार आणि समाजभान यांचा सुंदर समन्वय या कुटुंबात दिसून येतो.
डॉ. दीपक म्हस्के यांचे मनोगत
मुलाने वैद्यकीय क्षेत्र न निवडता कलाक्षेत्राची वाट धरली, तरी त्याने जे निवडले ते मनापासून आणि प्रामाणिकपणे केले. आपल्या आवडीच्या क्षेत्रात मेहनत घेत पुढे जाणे हेच खरे यश आहे. अथर्वने स्वप्न पाहण्याची हिंमत दाखवली, याचा आम्हाला अभिमान आहे.

डॉ. वैशाली म्हस्के यांचे मनोगत
आई म्हणून मला सर्वात मोठा आनंद याचा आहे की अथर्वने स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून स्वतःची ओळख घडवण्यासाठी असते. त्याच्या प्रत्येक यशामागे कष्ट, शिस्त आणि संस्कार आहेत. त्याचा पुढील प्रवास अधिक उज्ज्वल व्हावा, हीच आई म्हणून प्रार्थना आहे.

या सोहळ्यादरम्यान आतापर्यंत केवळ चित्रपटांच्या पडद्यावर पाहिलेले अनेक नामवंत कलाकार प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव कुटुंबीयांना मिळाला. मात्र चित्रपटसृष्टीतील ठरावीक शिष्टाचार व नियमांमुळे प्रत्यक्ष भेट घेता आली नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.चित्रपटसृष्टीच्या या मायावी दुनियेत आपल्या कल्पकतेच्या बळावर दर्जेदार कलाकृती निर्माण करून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा निर्धार अथर्वने व्यक्त केला असून, त्याच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अथर्वच्या या यशाबद्दल जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,विखे कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, तसेच रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments