चिंचपूर शिवारात १.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी चालक ताब्यात, साथीदार फरार

आश्वी (वा) : वैभव ताजणे, मो 7709254924
आश्वी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा तत्परता आणि धाडस दाखवत २१ फेब्रुवारी रोजी चिंचपूर (ता. संगमनेर) शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर यशस्वी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.


सविस्तर माहिती अशी की, आश्वी पोलिस ठाणे हद्दीतील चिंचपूर बिटचे अंमलदार हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पारधी आणि गोपनीय विभागाचे गणपत गोपाळे नियमित गस्त घालत असताना गावातून संशयास्पदरीत्या वाळू वाहतूक करणारे वाहन आढळले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहन अडवले असता चालक मयूर आंबादास बेळे (वय २४, रा. हनुमंतगाव ता. राहाता) हा अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासोबत असलेला साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.

अंधारामुळे त्याचा मागोवा घेता आला नसला तरी त्याचा शोध सुरू आहे.सदर प्रकरणाचा तपास आश्वी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पारधी करत आहेत. शिरसाट यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून मर्यादित मनुष्यबळ असतानाही त्यांनी कारवाईचा वेग वाढवला आहे.विशेष म्हणजे, आश्वी पोलिस ठाण्यासाठी एक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक असे आंदाजे ५७ कर्मचाऱ्यांची मंजुरी असली तरी प्रत्यक्षात फक्त २७ ते २८ कर्मचारी कार्यरत आहेत यात ही अनेक विविध प्रकारच्या रजेवर नेहमीच असतात, एवढ्या कमी मनुष्यबळात तब्बल २६ गावांची जबाबदारी सांभाळत पोलिसांनी केलेली ही कारवाई त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे आणि जिद्दीचे उदाहरण ठरत आहे.स्थानिक नागरिकांकडून या धाडसी कारवाईचे कौतुक होत असून अवैध वाळू तस्करीविरोधात पोलिसांनी अशीच कठोर भूमिका कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



























0 Comments