राहाता, वैभव ताजणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोणी दौऱ्या दरम्यान दिलेल्या मदतीच्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले,अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या. “एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. अधिकाऱ्यांनी वेळेत कार्यवाही करून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली. ही सरकारची बांधिलकीच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात दीपावलीनिमित्त लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडला. या वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आण्णासाहेब भोसले, डॉ. भास्करराव खर्डे, कैलास तांबे, शिवाजीराव जोंधळे, पोपटराव वाणी, किशोर नावंदर, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातही चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील व सौ. धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन झाले. मंत्री विखे पाटील, सौ. शालिनी विखे पाटील, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विखे परिवाराने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.



“शेतकऱ्यांच्या मदतीचे आश्वासन पूर्ण”
ना. विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ३ हजार २०० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करून केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. तसेच पायाभूत सुविधांसाठी ३२ हजार कोटींचे नियोजनही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या निर्णयाने अर्थचक्राला चालनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी वस्तू व सेवाकर (GST) कमी करून जनतेला दिलासा दिला. “या ऐतिहासिक निर्णयाचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन जनतेने उत्साहाने स्वीकारले, त्यामुळे बाजारपेठांत उत्सवाचे चैतन्य निर्माण झाले,” असे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

0 Comments