डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान शिबिर — १००० रक्तदात्यांचा महासंकल्प
संगमनेर,वैभव ताजणे

एक वेळ रक्तदान ,अनेकांचे प्राण वाचवू शकते. प्रत्येक रक्तदात्याने या महाउपक्रमात सहभागी होऊन समाजसेवेचा संकल्प पूर्ण करावा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे संपूर्ण जीवन मानवसेवेला अर्पण आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त समाजासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम राबवणे हीच खरी वाढदिवसाची भेट आहे. एक हजार रक्तदात्यांचा सहभाग म्हणजे मानवतेचा उत्सवच ठरणार आहे.” शिबिरासाठी अनुभवी डॉक्टरांची टीम, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक सज्ज असून रक्तदात्यांसाठी आरोग्य तपासणी, प्रमाणपत्र व अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याची माहीती राजन शिंदे यांनी दिली.

युवानेते डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे कार्य पुढे नेण्याच्या उद्देशाने मा. राजनदादा शिंदे पाटील युवा मंच, संगमनेर (चंदनापुरी जिल्हा परिषद गट) यांच्या वतीने या वर्षी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुंदराबाई डेंगळे सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, संगमनेर खुर्द येथे भरविण्यात येणार असून या उपक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे १००० रक्तदात्यांचा महासंकल्प असल्याची माहिती युवा मंचाचे प्रमुख राजन शिंदे यांनी दिली.

पुढे बोलतांनी त्यांनी सांगितले की,परिसरातील रुग्णालयांना, गरजू रुग्णांना, अपघातग्रस्तांना, गर्भवती महिलांना तसेच गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम मोठा आधार ठरणार आहे.
ग्रामीण भागात रक्तदान चळवळीला नवी दिशा देणारा हा उपक्रम समाजातील संवेदनशीलता व मानवतेचे मूल्य अधिक दृढ करणार आहे.राजनदादा शिंदे पाटील युवा मंच नेहमीच समाजोपयोगी उपक्रम, जनजागृती कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक मदत आणि युवा विकासाच्या विविध उपक्रमांतून समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावत आहे.

मंचाच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे तरुणाईमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होऊन सेवा व सहकार्याची चळवळ अधिक बळकट होत आहे.या रक्तदान शिबिरामुळे संगमनेर तालुका व परिसरात सामाजिक एकतेचा, सहकार्याचा आणि मानवतेचा संदेश नव्या उंचीवर पोहोचत असून तरुणांची समाजसेवेप्रतीची बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. आयोजकांनी नागरिकांना या महाउपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राजनदादा शिंदे पाटील युवा मंचा तर्फे करण्यात आले आहे

0 Comments