आश्वी खुर्द येथे शालिनीताई विखे पाटील व निलमताई खताळ पाटील यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

आश्वी, वैभव ताजणे मो 7709254924
महिला या शब्दामध्ये म म्हणजे महान, हि म्हणजे हिमत आणि ला म्हणजे लाजाळू या तिन्ही गुणांचे सुंदर संमिश्रण म्हणजे महिला होय. मनात दृढ श्रद्धा असेल, तर कोणतेही अशक्य कार्य शक्य होते, हे बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांनी आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले. महादेवावरील त्यांची अपार श्रद्धा आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त पूंजाआई मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या त्रिदिनी सप्ताह सोहळ्यानिमित्त महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व निलमताई खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी वस्त्रदान व हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.भाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी वस्त्रदान केले, तर हळदी-कुंकू वाण योगेश लुकंड यांनी दिले.या कार्यक्रमास सरपंच अलका गायकवाड, ह.भ.प. ज्योतीताई पवार, लता यादव, सुप्रिया भडकवाड, विमल मेहेरे, माया कहार, राधा कहार, लता कांबळे,गौरी लंवाडे शोभा गवळी, वैशाली बिडवे, सोनाली गायकवाड, कल्पना पऱ्हे, रंजना गायकवाड, योगिता सोनवणे, पूर्णिमा पंडुरे, माई कचेरिया,पुजा भडकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


त्या पुढे म्हणाल्या की, पारायण वाचनामुळे मनामध्ये आध्यात्मिक, धार्मिक तसेच सकारात्मक विचारांची निर्मिती होते. हेच विचार पुढे समाजहिताची कार्ये घडवून आणतात. संक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप असो किंवा हळदी-कुंकू कार्यक्रम — अशा प्रसंगी महिला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करतात. यामुळे सामाजिक सलोखा, स्नेहभाव आणि सांस्कृतिक मूल्ये अधिक दृढ होतात.


बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्यासारख्या अदृश्य शक्तीच्या आशीर्वादामुळे सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आज आमदार होऊ शकला. खऱ्या अर्थाने देवभक्तीमुळेच संगमनेर तालुक्यातील गेल्या ४० वर्षांच्या दडपशाहीच्या राजकारणाला भेदून आमदार अमोल खताळ पाटील सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सक्षमपणे लढा देत आहेत.पठार भाग व तळेगाव परिसरात शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती निलमताई खताळ पाटील यांनी दिली.





या कार्यक्रमास संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी भेट देऊन पूंजाआईंचे दर्शन घेतले.याप्रसंगी ह.भ.प. सुनील महाराज पवार यांच्या उपस्थितीत पूंजाआई महात्म्य पारायण वाचन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावात संपन्न होत आहे


कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक अॅड. अनिलराव भोसले, बापूसाहेब गायकवाड, उपसरपंच बाबा भवर, सोपान सोनवणे, पत्रकार संजय गायकवाड, कैलास गायकवाड, संतोष भडकवाड, शरद सोनवणे, बाबा भोसले, मनोज कहार, कृष्णा कहार, मनोज मेहेरे, आशिष गायकवाड, गौरव मुंतोडे, गोरख गव्हाणे, दगडू गायकवाड, अतुल भोकरे, संजय देशमुख, संजय भोसले, उमेश सालकर, अमोल गायकवाड, दामू गायकवाड, संजय साबळे, तान्हाजी गायकवाड, अमोल भडकवाड यांनी विशेष योगदान दिले.



0 Comments